Drawing Class: Drawing book designs

Design Task: I have made simple designs using 123D design and Google Sketch up software. The designs we learnt from our drawing class. 












FAB LAB : Advanced Automatic water level tank (motor) controller circuit

I have helped to Gudiya (electrical student) for making her project (made circuit). The project of Automatic water level tank (motor) controller.

I helped to her, how to give proper connections as circuit diagram and components soldering etc.  After the connections, we have checked circuit with load (bulb).

Project has done successfully.  

Components List

Sr. No.
Comp. Name
Qty.
1
IC -555
01
2
Transistor –BC547
01
3
Resistor- 10 K
03
4
Resistor-100 K
01
5
Resistor- 1 M
02
6
Diode-1N4007
01
7
Relay- 12V
01
8
Adaptor -12V
01
9
Capacitor  -0.01uf
01
10
Wirers for connecting


Circuit diagram






विभाग : वर्कशॉप - प्रकल्प (Project)


विज्ञान आश्रम, पाबळ.
विभागाचे नाव
:
अभियांत्रिकी (वर्कशॉप)
प्रकल्पाचे नाव
:
दिव्यांगासाठी गाडा
विद्यार्थ्याचे नाव
:
संदीप जगन्नाथ मोरे
मार्गदर्शन
:
जाधव सर, विश्वास सर व शुभम (DIC)
प्रकल्प सुरु केल्याची दिनांक 
:
31.12.2016
प्रकल्प संपण्याची दिनांक
:
01.02.2017






अनुक्रमणिका

अ.क्र.
शिर्षक
पान.क्र.
१.
प्रस्तावना
२.
उद्देश व नियोजन
३.
साहित्य व साधने
४.
डिजाईन
५.
कृती
७, ८, ९ व १०
६.
समस्या
११  
७.
गाडा निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च
१२
८.
अनुभव व निरीक्षणे
१३
९.
अनुमान व संदर्भसूची  
१४
१०.
छायाचित्रे
१५


प्रस्तावना :-

वास्तविक घरामध्ये व इतर कामाच्या ठिकाणी अपंगाना चाकाच्या गाड्यावर बसून काम करणे सुलभ व्हावे त्याचबरोबर घरामधील वावर व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने गाड्याची निर्मिती केली आहे. गाडा तयार करीत असताना वर्कशॉप (Fabrication) मधील सर्व कामांची व मशीन्सची ओळख व्हावी हाही एक उद्देश आहे. हा गाडा तयार करीत असताना आणखी एक तंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे गाड्याला नायलॉच्या चाकाला शाफ्ट (बारला नटबोल्ट वेल्डिंग करून) बसवून त्याला Drive दिला आहे, त्यामुळे रॅचेट पान्याच्या सहाय्याने गाडा पुढे सरकतो.

उद्देश :

गाड्यावर बसून बैठी कामे सुलभ रीतीने करता यावीत त्याचबरोबर रॅचेट सिस्टमचा वापर करून गाडा पुढे पळवणे.

नियोजन :-

विज्ञान आश्रमचे संचालक श्री. योगेश कुलकर्णी सर यांनी सुचविल्याप्रमाणे मला व माझ्यासारख्या इतर अपंगाना गाड्यावर बसून वर्कशॉप मध्ये काम  करणे सुलभ व्हावे या उद्देशाने श्री. जाधव सर, विश्वास सर व शुभम (DIC) यांच्या मार्गदर्शनाखाली गाडा तयार केला.
सुरवातीला कच्चे डिजाईन तयार करून त्यासाठीचे सर्व साहित्य मिळवले. जवळ -जवळ सर्वच साहित्य आश्रमामध्येच उपलब्ध झाले.
लांबी ६० से.मी. व रुंदी ५० से.मी. या आकाराचा गाडा तयार करण्याचे ठरविले. खालील लिंक वरील गाड्याचा अभ्यास केला.

साहित्य :

अ.क्र.
साहित्याचे नांव
1.
L – Angle
2.
Patti
3.
Bar
4.
Plywood
5.
Nylons Wheel
6.
Nylons Wheel
7.
Screw Nat bolt
8.
Screw Nat bolt

साधने :

अ.क्र.
साधने नांव
1.
Welding Machine
2.
Cutter Machine
3.
Grinder
4.
Drill Machine
5.
Plywood cutter
6.
Screw driver
7.
Hammer
8.
Majoring tep
9.
Flyer
10.
Spanner

डिजाईन :


कृती :- 

नियोजनाप्रमाणे सुरवातीला गाड्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्रित केले. डिजाईननुसार लांबी ६० से.मी. व रुंदी ५० से.मी. या आकाराचे चार L- angle कटर मशीनवर कट करून घेतले. प्रत्येकाचे चार कोपरे 450 मध्ये कट करून  ग्राईंडर मशीनवर ग्राईडिंग करून घेतले.



सर्व Angle वेल्डिंग करून त्याची फ्रेम बनवली. चार कोपऱ्यात नायलॉन चाके बसविण्यासाठी पट्टी मटेरीअलचे एकाच साईजचे चार शाफ्ट तयार करून घेतले. त्या शाफ्टला चाके नटबोल्टनी फीट करण्यासाठी प्रत्येक शाफ्टला ड्रील मशीनने प्रत्येकी चार व्होल पाडून घेतले. चार शाफ्ट वेल्डिंग करून बसवले.



चार कोपऱ्यात चाक बसविण्यासाठी तयार केलेल्या शाफ्टला नटबोल्टने नायलॉन चाके फीट केली.
नंतर लांबी ६० से.मी. व रुंदी ५० से.मी. या आकाराचे प्लायवूड कटर मशीनने कट करून गाड्याला व्यवस्थित बसवून घेतले.




गाड्याला ड्राईव्ह देण्यासाठी प्लायवूडला 4 इंच नायलॉनचे चाक मधोमध बसेल इतका भाग कट करून घेतला. 40 से.मी. लांब व 10 x 10 मि. मी. व्यास असलेला बार घेऊन त्याला बोल्ट वेल्डिंग करून एक शाफ्ट तयार केला व त्याला नायलॉन चाक बसवले. पुन्हा ते चाक फिरण्यासाठी (बार अडकविण्यासाठी) पत्रा बेंडिंग मशिनच्या सहाय्याने 900 मध्ये बेंड करून दोन पट्टी मटेरीअल शाफ्ट तयार केले, त्याला ड्रीलने व्होल पाडून नट बोल्टनी गाड्याला फिट केले.



आलेली समस्या :

ही सर्व कृती पूर्ण झाल्यानतर गाडा रॅचेट पान्याच्या सहाय्याने फिरवून पाहिला, परंतु फिरला नाही. कारण चाक बारशाफ्टमधून स्लीप होत होते.
त्यानंतर 63 x 24 x 2 mm आकाराचा पट्टीशाफ्ट तयार करून चाकालाच स्क्रू- नटबोल्टनी फीट करून बारशाफ्टलाच वेल्डिंग करून बसवला. ही पद्धत वापल्यामुळे रॅचेट पान्याच्या सहाय्याने गाडा पुढे सरकू लागला.




गाडा निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :

अ.क्र.
साहित्याचे नांव
ए.वापर
दर
किमत
1.
L – Angle (60 x 50 C.M.)
220 C.M.
45 (प्र.किलो)
73.26
2.
Patti Shaft (8 C.M.)
8 C.M.
45 (प्र.किलो)
06.37
3.
Bar (Rod) Shaft
40 C.M.
45 (प्र.किलो)
17.00
4.
Plywood (23.7” x 19.8”)
3.25 SQFT
20 (SQFT)
65.00
5.
Nylons Wheel (3”)
04 nos.
100
400.00
6.
Nylons Wheel (4”)
01 nos.
120
120.00
7.
Screw Nat bolt (3 mm -1”)
16 nos.
02
32.00
8.
Screw Nat bolt (4 mm -2”)
02 nos.
03
06.00
9.
Screw Nat bolt (5 mm -2”)
04 nos.
05
20.00
10.
Nat bolt (10 mm -2”)
02 nos.
10
20.00

Total Amount


759.63

 अनुभव व निरीक्षणे :
  •  वर्कशॉप मध्ये काम करीत असताना सेफ्टी टूल्सचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • कमकुवत वेल्डिंग केल्यास वेल्डिंग केलेली वस्तू थोडीजरी हलवल्यास लूज होते व तुटते, त्यामुळे व्यवस्थित वेल्डिंग करणे गरजेचे आहे.
  • कोणतीही वस्तू किंवा उपकरण बनवायच्या अगोदर त्याचे नियोजन, मापन व डिजाईन या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत.
  • कटर मशीनवरून कट केलेले मटेरिअल ग्राईडिंग करणे अत्यंत महत्वाचे.
  • अभियांत्रिकी विभागातील बऱ्याचशा मशीनन्स व साधने हाताळता आली.



अनुमाण :

  •   गाडा निर्मिती हे वर्कशॉप मधील जास्तीत जास्त मशीन्स व साधने हाताळण्याचे उद्दिष्ट होते.
  •     अनुभव वाढला असून यांसारख्या अनेक नवीन उपयोगी गोष्टी व उपकरणे बनवता येतील अशी खात्री आहे.


संदर्भ सूची :



छायाचित्रे :