विभाग : शेती व पशुपालन : माती परिक्षण संच (प्रेरणा कीट) वापरून माती परीक्षण करणे.

माती परिक्षण संच (प्रेरणा किट) वापरून त्यातील पुस्तकामधील (Mannual) सूचना प्रमाणे माती पारीक्षण करता येते. माती पारीक्षण करण्यापूर्वी खालील तयारी करणे/मातीचा नमुना घेणे गरजेचे आहे.

शेत नांगरणी पूर्वी व पेरणी अगोदर मातीचा नमुना झिगझॅग पद्धतीवर साधारण दहा ते पंधरा ठिकाणावरील व्ही आकारामध्ये खणून घेणे. माती घमेल्यात एकत्रित मिक्स करणे. एक दिवस चांगली  वाळवणे/सुखावणे. 
माती गोल आकारात पसरून त्याचे समान चार भाग करून घेणे. व समोरच्या दोन क्रॉस भागातील माती बाजूला काढणे. साधारण २५० gm. माती घेणे. माती परिक्षणसाठी माती चाळून घ्यावी. माती परिक्षण संचचा वापर केला.

माती परीक्षणासाठी खालील जागेतील माती घेऊ नये.
१) कचरा टाकण्याची जागा.
२) दलदलीची जागा.
३) जनावरे बसण्याची जागा व झाडाखालची जागा.

४) पाण्याखालील जागा. 





Post a Comment