विज्ञान आश्रम, पाबळ.
विभागाचे नाव
|
:
|
शेती व पशुपालन
|
प्रकल्पाचे नाव
|
:
|
कडूनिंब पानांपासून जैविक
कीडनाशक.
|
विद्यार्थ्याचे नाव
|
:
|
संदीप जगन्नाथ मोरे
|
मार्गदर्शन
|
:
|
श्री. सचिन लोखंडे
|
प्रकल्प सुरु केल्याची
दिनांक :-
|
:
|
१९.०५.२०१७
|
प्रकल्प संपण्याची दिनांक
|
:
|
२१.०५.२०१७
|
अनुक्रमणिका
अ.क्र.
|
शिर्षक
|
पान.क्र.
|
१.
|
प्रस्तावना
|
३
|
२.
|
कडूनिंबातील महत्वाचे घटक
|
४
|
३.
|
उद्देश व नियोजन
|
५
|
४.
|
साहित्य व साधने
|
६
|
५.
|
कृती व वापरण्याची पद्धत
|
७
|
६.
|
कडूनिंब अर्कचे फायदे
|
८ व ९
|
७.
|
अर्क निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष
खर्च
|
१०
|
८.
|
अनुभव, निरीक्षणे व
संधर्भ सूची
|
११
|
९.
|
छायाचित्रे
|
१२ व १३
|
प्रस्तावना :-
निसर्गामध्ये आपल्या सभोवताली भरपूर उपयोगी
गोष्टी आपल्याला मिळत असतात, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. त्यातीलच एक
भाग म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये किडरोग नियंत्रणासाठी कडूनिंब अत्यंत उपुयक्त आहे.
कडूनिंबापासून निंबोळया किवा पानांचा अर्क हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कीड, रोग व
जीवाणू नियंत्रक आहे. त्याचबरोबर कडुनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास
प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध,
किडीस खाद्यप्रतिबंधक, किड वाढ रोधक व किटकनाशक या विविध मार्गाने परिमाण साधतो. हा अर्क अत्यंत सहज व
सोप्या पद्धतीने बनवता येतो. कडूनिंबाच्या २ किलो पानांपासून १ लिटर आर्क बनवला.
कडूनिंबातील महत्वाचे घटक :
१. ऍझाडिरेक्टीन : साधारणत: हा घटक 90 टक्के
परिणामकारक असून, किडीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्याची शक्ती या घटकामध्ये आहे.
२. निम्बीन व निम्बीडीन : या महत्वाच्या घटकामध्ये विषाणूविरुद्ध क्रिया करण्याची शक्ती आहे.
हा
घटक पिकांवरील विषाणूजन्य रोगांवर, तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवरसुद्धा
नियंत्रणास उपयुक्त ठरतो.
3.
मेलियान ट्रिओल - या घटकामुळे
किडी झाडांची व रोपांची पाने खाऊ शकत नाही. टोळधाडीसाठीही परिणामकारक आहे.
४. सालान्निन - हे
पिकांवरील पाने खाणाऱ्या किडींवर प्रभावीपणे कार्य करते.
भुंगे, खवले, कीटक यांवरसुद्धा प्रभावी आहे. त्यात अजून
एक घटक महत्त्वाचा असून त्याला "डिऍसिटील ऍझाडिरेक्टीनॉल' असे म्हणतात.
उद्देश व नियोजन :
उद्देश :
सेंद्रिय शेतीमध्ये किडरोग
नियंत्रणासाठी कडूनिंब अत्यंत उपयोगी आहे. कडूनिंब पानांचा अर्क हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक
कीड, रोग व जीवाणू नियंत्रक आहे, या उद्देशाने कडूनिंबाच्या पानांचा अर्क बनवला.
नियोजन :-
श्री. सचिन लोखंडे सर यांच्या
मार्गदर्शनाखाली व इंटरनेट वरून माहिती मिळवून २ किलो कडूनिंबाची पाने व 1 लिटर
पाण्याचा अर्क तयार करण्याचे ठरवले.
साहित्य :
- कडूनिंब पाने
- पाणी
साधने :
1.मिक्सर 2. वजनकाटा 3. मेजारिंग सिलेंडर 4. भांडी 5. इंधन –LPG गॅस इ.
कृती :-
- नियोजनाप्रमाणे सुरवातीला अर्कसाठी कडूनिंबाची पाने काढून छोट्या फांद्यापासून सर्व पाने बाजूला केली.
- दोन किलो पाने व एक लिटर पाणी घेऊन सर्व पाने मिक्सरला बारीक करून घेतली. मिक्सरला बारीक करून घेतलेली पाने (अर्क) पूर्ण एक रात्र भिजत ठेवली.
- दुसऱ्या दिवशी अर्क उकळून घेतला.
- थंड झालेला अर्क चांगला मळून घेतला.
- शेवटी स्वच्छ सुती कापडामध्ये वस्त्रगाळ करून घेतला.
- एक लिटर अर्क तयार झाला.
वापरण्याची
पद्धत :
हे सर्व
मिश्रण 10 लिटर पाण्यात मिसळून सकाळच्यावेळी फवारावे. यामुळे रोपांची पाने खाणारी
सर्व कीड मारून जाईल.
कडुनिंब अर्कचे फायदे :
१. अंडी घालण्यास प्रतिबंधात्मक कार्य-
कडुनिंब अर्कामुळे
पिकावरील विविध किडीच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. उदा. घाटे अळी (Helicoverpa
Armigara) तंबाखूवरील पाने खाणारी अळी, (Spodoptera Litura),
एरंडीवरील उंट अळी (Castor Semilooper) पांढरी
माशी, गुलाबी बोंड अळी तसेच साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये
सुद्धा अंडी घालण्यास प्रतिबंध ठरते. 3 टक्के कडुनिंबाची
वाळलेली पाने साठविलेल्या उडीद धान्यासाठी 5 महिन्यापर्यंत
परिणामकारक ठरतात
२. कीडरोधक दुर्गंध :
भारतीय शास्त्रज्ञ आर.
एन. चोप्रा आणि एम. ए. हुसेन यांच्या मते कडुनिंबापासून किड शोधक तीव्र गंधामुळे
विविध किडींना दूर ठेवणे शक्य होते.
उदा. भुंगा, पांढरी माशी, घरमाशी, पिसू, जपानी किटक, लष्करी अळी, मिलीबग इत्यादी.
उदा. भुंगा, पांढरी माशी, घरमाशी, पिसू, जपानी किटक, लष्करी अळी, मिलीबग इत्यादी.
3. किडीस खाद्यप्रतिबंधक:
कडुनिंबाच्या
बियांपासून तसेच तेलापासून तयार केलेला अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध
प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी,
घरमाशी, मिलीबग, लष्करी
अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी.
5. कीडवाढ
रोधक
कडुनिंबातील अझाडिराक्टीन
हा घटक किडीची वाढ थांबवतो, तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो.
त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. पांढरी माशी, घरमाशी,
पिस बटाट्यावरील कोलोरॅडोकिड, लष्करी अळी
इत्यादी प्रकारच्या किडींची वाढ थांबते. या व्यतिरिक्त कडुनिंबाच्या बियातील
गरामध्ये मेथेनॉलिक या रासायनिक घटकामुळे तंबाखूवरील पाने खाणारी अळीची वाढ
थांबते.
6.कीटकनाशक:
कडुनिंबापासूनचे अर्क व कीडनाशके ही कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात. मुख्यत्वे कडुनिंबाची पाने, फळे व झाडाच्या सालीपासून उत्तम किडनियंत्रक तयार करता येते.
7. नियंत्रित होणारे
कीटक :
मावा,
तुडतुडे, फुलकिडे, पांढरी
माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी
बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती,
भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील
पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी,
ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील
सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व
पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, झुरळ
प्रजाती धान्य साठवणीतील किडे, मेंढ्यांवरील माश्या
इत्यादी.
8. नियंत्रित होणारे
रोग
1. वांगी,
नारळ, केळी, नागवेलीची
पाने व हरभऱ्यावरील मर रोग
2. वाटाणे, उडीद यावरील भुरी रोग
3. बटाटे, साळी यावरील विषाणू रोग तसेच टोबॅको मोझेक, हरभऱ्यावरील मुळकूज, मुगाचे रोप जळणे, मक्यावरील डाउनी मिलड्यू, साळीवरील बॅक्टेरियल ब्लाइट इत्यादी. या व्यतिरिक्त बुरशीनाशक, जीवाणूनाशक व विषाणूरोधक म्हणून परिणामकारक आहे.
2. वाटाणे, उडीद यावरील भुरी रोग
3. बटाटे, साळी यावरील विषाणू रोग तसेच टोबॅको मोझेक, हरभऱ्यावरील मुळकूज, मुगाचे रोप जळणे, मक्यावरील डाउनी मिलड्यू, साळीवरील बॅक्टेरियल ब्लाइट इत्यादी. या व्यतिरिक्त बुरशीनाशक, जीवाणूनाशक व विषाणूरोधक म्हणून परिणामकारक आहे.
अर्क निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :
अ.क्र.
|
साहित्याचे नांव
|
एकूण साहित्य वापर
|
दर
|
एकूण किमत
|
1.
|
कडूनिंब पाने
|
२ किलो
|
10
|
20
|
2.
|
इंधन –मिक्सर
|
अर्धातास
|
10
|
10
|
3.
|
इंधन – LPG गॅस
|
अर्धातास
|
10
|
10
|
|
एकूण खर्च
|
|
|
40
|
मजुरी 15%
|
|
|
06
|
|
एकूण प्रत्यक्ष खर्च
|
|
|
46
|
अनुभव व निरीक्षणे :
- आपण निसर्गातील विविध गोष्टीचा वापर करून अनेक प्रकारचे अर्क बनवू शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे.
- कडूनिंब पानांच्या अर्क बरोबरच लसून –मिरची, लसून-मिरची-रॉकेल व तंभाखूपासूनही अर्क बनवू शकतो.
- हा अर्क डासांसाठीही परिणामकारक ठरतो हा अनुभवही आला.
- अर्क बनवलेल्या तारखेपासून सहा महिने हा अर्क शेतात फवारणीसाठी वापरू शकतो.
- कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते.
संदर्भ सूची :
1. इंटरनेट.
छायाचित्रे :
Post a Comment