साहित्य :- लँसेट, कापूस, काचपट्या (स्लाईड्स), स्पिरीट, Anti A, Anti B,
Anti D.
कृती :- प्रथमता: आम्ही रक्तगट म्हणजे काय व तो
कसा चेक करावयाचा हे समजून घेतले. आणि आमच्या सेक्शन मधीलच मुलांचे रक्तगट चेक
केले. रक्तगट बरोबर असल्याची खात्री करून घेतली.
प्रात्यक्षिकामधील कृती : आपल्याला ज्या
व्यक्तीचा रक्तगट चेक करावयाचा आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील
बोटाचे रक्त घ्यायचे. त्याअगोदर ती जागा स्पिरीटने स्वच्छ निर्जंतुक करावी. बोटावर
लँसेटनी टोचून रक्त काढावे. ते रक्त काचपट्टीवर तीन (3 drops) ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर Anti A, Anti B,
Anti D. या बॉटलमधील अँटीसिरा त्या
काचपटीच्या घेतलेल्या रक्तावर एकेक थेंब टाकणे. अँटीसिराचे थेंब टाकल्यावर थोडावेळ
थांबणे. त्यानंतर पट्टी हळू हळू हलवणे, अँटीसिरा व रक्त मिसळण्यासाठी. खालील
निरीक्षण अनुमान नुसार रक्तगट ओळखता येतो.
आम्ही आमच्या सोयीसाठी विसरू नये म्हणून
काचेच्या स्लाईड एवढी कागदाची पट्टी तयार करून त्यावर Anti A, Anti B,
Anti D असे लिहून मग
त्याच्यावर काचेची पट्टी ठेवली होती मग त्यावर अँटीसिराचे (Anti A, Anti B,
Anti D) drops सोडले होते.
निरीक्षण
|
अनुमान
|
फक्त अँटीसिरा A व
D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या
तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट A (+) ve
|
फक्त A अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट A (-) ve
|
फक्त अँटीसिरा B व
D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या
तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट B (+)
ve
|
फक्त B अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट B (-)
ve
|
अँटीसिरा A,B व D
टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (+)
ve
|
फक्त A व B अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (-)
ve
|
फक्त अँटीसिरा A व
B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत व D मध्ये गुठळ्या तयार
झाल्या तर
|
रक्तगट O (+) ve
|
अँटीसिरा A,B व D
टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर
|
रक्तगट O (-) ve
|
Post a Comment