विभाग : इलेक्ट्रीकल (ऊर्जा आणि पर्यावरण)- ग्रे वॉटर प्रकल्प :

दिवसेंदिवस पावसाची अनियमितता वाढल्यामुळे पाणी साठवणे, जमिनीमध्ये जिरवणे ही जसी काळाची गरज बनली आहे तसेच पाण्याचा पुर्नवापर करणे, हेही तितकेच महत्वाचे बनले आहे. त्यासाठी ग्रे वॉटर प्रकल्प अत्यंत सुलभ व कमी खर्चिक आहे. कोणत्याही केमिकलचा वापर न करता या पद्धतीने पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुर्नवापर करता येईल. या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी नाही निदान बागेसाठी, शेतीसाठी, बांधकामासाठी तरी नक्कीच वापरू शकतो.
आम्ही विज्ञान आश्रमातील ग्रे वॉटर प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली.

  • ग्रे वॉटर मध्ये आंघोळीचे, कपडे व भांडी धुतलेले त्याचबरोबर इतर वेळी वापरलेले (एकूणच संडास मधील सोडून) सर्व पाण्याचा समावेश होतो.
  • या प्रकल्पासाठीच्या टाक्यांचे बांधकाम पद्धतशीर करणे आवश्यक आहे.
  • या प्रकल्पामध्ये कर्दळ, पानकणीस, व आळू या वनस्पतींचा वापर केला आहे. या पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी.






मलाही हा प्रकल्प खूप आवडला त्यानुसार मीही माझ्या रुमच्या समोर छोटा (फिल्टर) प्रकल्प तयार केला. त्यामध्ये जेवण झाल्यानंतरचे खरकटे पाणी व भांडी धुऊन झालेले पाणी ओतले जाते. आणि मला त्याचा Result  मिळाला. पाण्याचे COD चेकिंग करायचे आहे. COD चेक झाल्यानंतर मला आणखी खात्री पटेल.







 

Post a Comment