अर्थिंग म्हणजे एखादया उपकरणाच्या बॉडीला/मशिनच्या (प्लास्टिक आवरणाला)
निर्माण झालेला Current (लीकीज) जमिनीमध्ये सोडणे.
वायरवरील इन्सुलेशन खराब किंवा कट होऊन उपकरणामध्ये Current येणे. न्युट्रल वायर जेव्हा फेज होते तेव्हा त्या
उपकरणास शॉक बसतो.
अर्थिंग दिल्याने current सुवाहक असल्याने कमी रेजीस्टन्स वायरमधून पटकन वाहतो
व ग्राउंड होतो. व्होल्टेज जास्त विद्यत दाबाकडून कमी विद्युत दाबाकडे वाहते.
अर्थिंग कशी करावी
·
क्षेत्रानुसार अर्थिंग प्रकार ठरवावा (पाईप अर्थिंग/प्लेट
अर्थिंग)
·
ओलसर मातीची जागा निवडावी की जेणेककरून त्या जमिनीमध्ये
पाणी टिकून राहण्याची क्षमता असेल
·
जमिनीमध्ये एक ते दीड मीटर खड्डा खोदणे.
·
GI पाईप किवा बीडाची प्लेट वायरसहित स्क्रू फिटिंग करून
घेणे.
·
प्लेट/पाईप खड्डयामध्ये बसवून conductivity नुसार मीठ साधारण (5 किलो) टाकणे.
·
विटांचे तुकडे टाकणे.
·
चार ते पाच बदल्या पाणी ओतणे. खड्डा मुजवून घेणे.
Post a Comment