विभाग : इलेक्ट्रीकल (ELECTRICAL) : सुरक्षितता/ दक्षता :



इलेक्ट्रिकल अथवा कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना सुरक्षितता पाळणे व सुरक्षित काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करीत असताना खालील सुरक्षितता घेणे गरजेचे आहे.

    वैयक्तिक सुरक्षा/दक्षता :

  •  बाहेरील साईटवर खांबावरील तारेचे काम करीत असाल तर कामापूर्वी DP मधील मेन स्वीच बंद करावा. मेन स्वीच DP चाव्या आपल्या ताब्यात घ्याव्यात.

  • हातात प्लास्टिकचे हॅण्डग्लोज घालावेत.

  • हेल्मेट वापरावे.
  • वायरमन असलात तर परवाना आवश्यक.
  • कोणतेही इलेक्ट्रिकल वायरिंग अथवा बोर्ड फिटिंगचे काम करीत असताना पायामध्ये रबरी चप्पल अथवा लाकडी फळी वापरावी.

साहित्य सुरक्षा/दक्षता :

  • वापरत असलेले टेस्टर सुस्थितीत असावे. टेस्टर खराब असल्यास शॉक बसू शकतो.
  • लाईट फिटिंगसाठी अथवा कोणत्याही इलेक्ट्रिकल कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य चेक करूनच वापरावे.
  •  इलेक्ट्रिकल कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य उदा. पक्कड, टेस्टर, वायर, कटर इ. नेहमी वापरता येतील व्यवस्थित ऑपरेट होतील अशीच असावीत.
  •   रेटिंगनुसार/आवश्यकतेनुसार/Standard नुसारच साहित्याचा वापर करणे, लोडनुसार साहित्य वापरणे. (६ अम्पिअर स्वीच)


Post a Comment