वैयक्तिक ओळख

पत्ता
:
हेल्पर्स ऑफ दि  हॅण्डिकॅप्डकोल्हापूर द्वारा
समर्थ विद्या मंदिरउंचगाव (पूर्व)ता. करवीरजि. कोल्हापूर. पिनकोड नं. ४१६००५ 
मोबाइल नं.
:
9860515955
-मेल
:
svm.sandeepmore@gmail.com
संस्था वेब
:
कोर्स
:
DBRT- विज्ञान आश्रम पाबळ.   
प्रवेश दिनांक
:
10 जुलै, 2016
सध्या आत्मसात करत
असलेली कौशल्ये
:
शेती व गृह आरोग्य आणि फॅबलॅब

















विभागाचे नाव : गृह व आरोग्य प्रकल्पाचे नाव -पालक भाजीपासून पालक शेव.

विज्ञान आश्रम, पाबळ.

विभागाचे नाव
:
गृह व आरोग्य  
प्रकल्पाचे नाव
:
पालक भाजीपासून पालक शेव.  
विद्यार्थ्याचे नाव
:
संदीप जगन्नाथ मोरे
मार्गदर्शन
:
रेश्मा हवलदार  
प्रकल्प सुरु केल्याची दिनांक :-
:
२७.०५.२०१७
प्रकल्प संपण्याची दिनांक
:
२८.०५.२०१७


अनुक्रमणिका

अ.क्र.
शिर्षक
पान.क्र.
१.
प्रस्तावना
२.
पालक भाजीतील महत्वाचे घटक
३.
उद्देश व नियोजन
४.
साहित्य व साधने
५.
कृती व आलेल्या समस्या  
६.
पालक भाजीचे फायदे
७.
पालकशेव निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च
९  
८.
अनुभव, निरीक्षणे व संधर्भ सूची
१०
९.
छायाचित्रे
११ व १२

प्रस्तावना :-

पालक एक पालेभाजी असून, पालकाच्या भाजीत अ, ब, क व इ जीवनसत्व आहेत. त्याचबरोबर प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन व लोह हे घटक आहेत. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अमिनो अॅसीड असते.
इतके सगळे घटक असूनही लोक ही भाजी खाण्यास मनाई करतात. खास करून लहान मुलांना ही भाजी आवडत नाही. पालक भाजीपासून विविध चविष्ट पदार्थ बनवता येतात, याची माहिती घेतली. असे चविष्ट पदार्थ सर्वच आवडीने खातात. म्हणून पालक शेव करण्याचे ठरवून, रेश्मा हवलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पालक शेव’ बनवली.

पालक भाजीमधील महत्वाचे घटक :

कॅलशियम (मि.ग्रॅ.)
लोह (मि.ग्रॅ.)

कॅरोटीन (मायक्रोग्रॅम)

जीवनसत्व क (मि.ग्रॅ.)
७३
१.१४
५५८०
२८



उद्देश व नियोजन :

उद्देश :

गृह आणि आरोग्य (फूडलॅब) मधील जास्तीज जास्त साहित्य साधनांचा वापर करून पदार्थ बनवायला शिकणे. कॉस्टिंग काढणे. नवीन चविष्ट, कॅल्शियम व लोहयुक्त पदार्थ बनवून त्याचे चांगले पॅकिंग व लेबलिंग करून विक्री करणे.  

नियोजन :-

उपयुक्त साहित्य खरेदी (पालक पेंडी, बेसनपीठ इ.) केले. पालक शेव काढणेसाठी योग्य आकाराची चकती असलेला साचा उपलब्ध करून साहित्याचे प्रमाण ठरवून घेतले. 

साहित्य :

अ.क्र.
साहित्याचे नांव
        1.      
बेसनपीठ
        2.      
पालक पेंडी
        3.      
तेल
        4.      
मिरची
        5.      
लसून
        6.      
ओवा
        7.      
हळद
        8.      
मीठ
        9.      
सोडा

     

साधने :

साधने :
अ.क्र.
साधने नांव
        1.      
मिक्सर
        2.      
परात व इतर भांडी
        3.      
साचा 
        4.      
पक्कड 
        5.      
झारा 
        6.      
कडई
        7.      
वजनकाटा 
         8.      
इंधन :LPG गॅस





















कृती :- 

  • सुरवातीला ठरलेल्या प्रमाणानुसार सर्व साहित्याचे वजन करून घेतले.
  • पालक भाजी निवडून घेऊन, धुवून मिक्सरला बारीक करून त्याचा ज्यूस बनवला.
  • मिरची, लसून, व ओवा मिक्सरला बारीक करून घेतले.
  • बेसन पिठामध्ये मिरची, लसून, ओवा यांची पेस्ट व हळद, मीठ, सोडा हे सर्व मिक्स करून घेतले.
  • बेसन पिठामध्ये पालक ज्यूस घालून चांगले मळून घेतले.
  • पालक शेव तळण्यासाठी कडई मध्ये तेल गरम करण्यास ठेवले.
  • तेल गरम झाल्यानंतर मळलेले पीठ साचामध्ये भरून शेव पाडण्यास सुरवात केली.   
  • शेव चांगली तळून घेतली.

आलेल्या समस्या :

  • शेव पाडणेसाठीचा साचा व्यवस्थित नव्हता.
  • पालक शेवचा ज्यूस जास्त झाल्यामुळे ठरलेल्या प्रमाणापेक्षा अधिक बेसनपीठ वापरावे लागले.

पालक भाजीचे फायदे :
1. पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “केजीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे
2. पालक दुधाला देखील पर्य़ाय ठरू शकते. ज्यांना दुध आवडत नाही त्यानी पालकपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ करून खावेत
3. पालक-पनीर, पालक-पुरी, आलू-पालक, पालक-पकोडे अशा निरनिराळ्या प्रकारे आहारात या गुणकारी भाजीचा समावेश करता येतो. दुबळ्या शरिर य़ष्टीच्या मुलांची हाडे बळकट करण्यास या भाजीचा उपयोग होऊ शकतो. अनेक जीवनसत्त्वे व क्षारांनी परिपूर्ण अशी ही भाजी लहान-थोरांना पथ्यकर आहे.

पालक शेव निर्मितीसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :

अ.क्र.
साहित्य
एकूण वापर (नग/किलोग्रॅम)
दर (Per KG/NO.)
एकूण किमत
1.
बेसनपीठ
800 gm.
120
96
2.
पालक पेंडी
1 no.
10
10
3.
तेल 
180 gm.
80
14.40
4.
मिरची
20 gm.
80
1.60
5.
लसून
30 gm
120
3.60
6.
ओवा
5 gm
280
1.40
7.
सोडा
2 gm
50gm=6Rs
0.24
8.
हळद
2 gm
550
1.10
9.
मीठ
2 gm
18
0.36
10.
इंधन : LPG
1 hour
20 minute = Rs 1.20
3.60
11.
इंधन : मिक्सर
10 minute

2

एकूण


134
मजुरी 15%


20
एकूण खर्च


154

अनुभव व निरीक्षणे :

  • पालक भाजीपासून विविध पदार्थ बनवता येतात.
  • पालक शेव कमीत कमी एक महिनातरी खराब होत नाही.
  • हा पदार्थ खूप पोष्टिक असून लांबच्या प्रवासासाठी उपयोगी आहे.
  • पालक भाजी सर्व हंगामात उपलब्ध असते.

संदर्भ सूची :

  • इंटरनेट. 

छायाचित्रे :